Tuesday 17 August 2021

आमची पहिली रोड ट्रीप - रोहीडा किल्ला ट्रेक



तंबुत पहिल्यांदाच झोपायचा अनुभव, आदल्या दिवशी तसही भल्या पहाटे प्रवासाला केलेली सुरुवात आणि दिवसभराच्या मौजमस्तीमुळे आलेला थकवा तर काय मस्त झोप लागली तंबुत. सकाळी पहाटे लवकर उठुन किल्ल्यावर जायचा बेत तंबुतल्या उबदार वातावरणाने कधीच धुळीला मिळवला होता.

कसेबसे आम्ही ८:३० वाजता नाश्ता करुन तयार झालो. रोहीडागडाची चढाई तशी फार अवघड नाही. १:३० तासात किल्ल्यावर पोहचतो माणुस. किल्ल्यावर जायला गावात जाऊन रस्ता आहे. 

पण मागेच टेकडी आहे, किल्ला पण दिसतोय तर आम्ही विचारल, “काल त्या टेकडीवर गेलो होतो तिथुन नाही का रस्ता”

”तिकडुन पण जाता येईल पण गावातुन गेला तर बर होईल”

“अरे! इथुन पण आहे रस्ता तर इथुनच जातो की, इथुनच ट्रेक सुरु होईल, रस्त्याने कशाला जायच”

ते आम्हाला तरी सांगत राहीले की जाऊ शकता पण गावातुन जावा. गाडी घेऊन जावा आणि गावातल्या शाळेजवळ लावा, सोप पडेल.

पण आम्ही त्या टेकडी वरुनच सुरुवात केली. दिसायला समोरच तर दिसतोय की किल्ला. ह्या आधी तर आम्ही कळसुबाई पण रात्रीच्या अंधारात सर केलाय तर मग हा आरामात होईल. काल ज्या जागेवर गेलतो तिथं पर्यंत तर आरामात पोहचलो पण आता समोर किल्ला तर दिसतोय पण पायवाट कुठली घ्यायची. तिथं आसपास कोणी विचारयला पण नाही. आम्ही आडवाटेने चाललो होतो तर तिथे कशाला कोण असेल.

हां ही पायवाट जाईल किल्ल्याला असा निर्धार करुन आम्ही एक पायवाट निवडली. थोड पुढे गेलो आणि ती पायवाट गवतांमध्ये गुडुप.

आत्ता काय करायच, अरे ती बघ वरुन दिसतेय एक पायवाट, चला तिकडे. अस करुन ती पकडली, ती पण थोडीसी पुढे जाऊन गायब. नक्की पायवाटा आहेत की असच आम्ही पायवाट समजतोय ते ही कळेना.

एकतर त्या डोंगरावर गवत सगळ सुकलेल, नाही म्हटल तर चांगल गुडघाभर वाढलेल ते गवत आणि त्याच्या काड्या पायाला जाम टोचायला लागल्या. घातलेल्या बुटात त्या तुटुन तळपायांना तर जाम त्रास देऊ लागले. 

एका ठिकाणी बसुन शुज काढुन मी ते सगळ साफ केल तर पुढे पाचच मिनिटात नवीन गवत त्यात घुसुन मला त्रास द्यायला मोकळे

कसबस आम्ही त्याची सवय करुन घेतली आणि मिळेल त्या पायवाटेने, हीच पायवाट किल्ल्याला जातेय अस ठरवुन पुढे जात राहीलो. अजुन १५-२० मिनिट चालल्यावर आमच्या पुर्ण लक्षात आल की आता आपण रस्ता पुर्ण चुकलोय. तरी आम्ही त्या किल्ल्याच्या डोंगरालाच वळसा मारत होतो. डोंगराच्या एका कोपऱ्यात थोड्या विश्रांतीसाठी बसलो. पावसाळयात मस्त धबधबा होत असेल त्या जागेवर. १० मिनिटाचा आराम करुन पुढे निघालो. 

“अरे हे बघ इथुन वर जायला रस्ता दिसतोय, इथुन वर गेलो की आपल्याला तो मुख्य रस्ता लागेल”

सगळ्यांना ते पटल आणि मग अश्या ठिकाणी आम्ही चढाई करुन बसलो की आता वर जायला पण काही जागा नाही आणि आलो त्या रस्त्यावर मागे जायला घसरून जायची भीती. ५ मिनिट आम्ही सगळे स्तब्ध उभे राहीलो आणि चारही बाजुला नजर टाकली. खर सांगायच तर मी आता जाम घाबरलो, आता काय करायच. शेवटी अजुन एक पायवाट दिसली, आता तिने जाऊ अस सगळ्यांनी ठरवल. आजुबाजुच्या झाडांना पकडुन, त्यांच्या फांद्याच्या आधार घेऊन, थोडासा ढुंगणाचा पण आधार घेऊन घसरत, धडपडत त्या पायवाटेला लागलो.

थोड पुढे चालल्यावर एकाच्या लक्षात आल अरे आपण ते बसलो होतो तिथे सनग्लासेस राहीले. 

मी लगेच, “आता जाऊदे चल”

“अरे जवळच आहे ते, आपण ते मध्ये वर चढलो म्हणुन लाभ वाटतय, चल जाऊन येऊ पटकन”

“तुम्हीच या जाऊन, मी नाही येत आता” 

आणि दोघे जण परत गेले. आम्ही दोघे तिथेच बसलो. १० मिनिटात परत आले ते सनग्लासेस घेऊनच. पुढे पुढे ती पायवाट जरा चांगलीच स्पष्ट होत गेली. गावरान जागेचे मोजणीचे खांब दिसले, चला आलो एकदाचे जवळ. आणि मग पटकन झुडुपांमधुन आमची ती पायवाट किल्ल्याच्या मुख्य पायवाटेला लागली, माणसांची वर्दळ जाणवली आणि जीव भांड्यात पडला.

त्यानंतर नो टेन्शन. पटापट गड चढु लागलो. आमच्या हा जो काही पराक्रम केला होता त्यात ऊन खुपच वर आल होत, घामाच्या धारा सुरु झाल्या पण रस्ता फार चढणीचा असा नव्हता. बरेच लहान मुल ही आरामात किल्ला चढु शकतील किंवा कौटुंबिक ट्रेक साठी ही उत्तम पर्याय. फक्त आम्ही जो पर्याय निवडला तो निवडु नका.

वर पोहचल्यावर पहिल्यांदा मुख्य दरवाजांतुन तुम्ही किल्ल्याच्या आत येतां. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वार हे तीन दरवाज्यांनी बनवल आहे. पहिल्या प्रवेशद्वारात गणेशपट्टी आणि मिहारब आहे. आत गेल्यावर लगेचच उजवीकडे दुसरा दरवाजा आहे ज्यातुन आत गेल्यावर उजवीकडे एका खडकात कापलेला पाण्याची टाकी आहे. पिण्याच्या हेतूने हे पाणी वर्षभर उपलब्ध असते. दुसऱ्या दरवाजावर सिंह आणि शरभाच्या मूर्ती आहेत. अजुन काही पायऱ्या चढल्यावर तिसरा दरवाजा लागतो. दोन्ही बाजूला हत्तींच्या डोक्याच्या मूर्ती आणि फाटकच्या बाहेरील बाजूस फारसी आणि मराठीत शिलालेख आहेत. तिसऱ्या दरवाज्यातुन आत गेल्यावर डावीकडे थोड चालले की चांगल्या स्थितीत रोहिडामल्लाचे मंदिर आहे. 

गडावर सात बुरुज आहेत, आपल्याला सहा दिसतात, पुढे तीन आणि मागे तीन. बुरुजांची भक्कम तटबंदी अजुनही शाबुत आहे. ह्या बुरुजांची नावे म्हणजे शिरावाले बुरुज, पाटणे बुरुज, दामुगडे बुरुज, वाघजाई बुरुज, फत्ते बुरुज आणि सदर बुरुज. काही पुस्तकांमध्ये शिरजा बुरुजच्या उपस्थितीचाही उल्लेख आहे, परंतु त्याचे स्थान अज्ञात आहे. किल्ल्याच्या दक्षिण बाजूस दगडी पाण्याच्या कुंडांची मालिका आहे. गड पुर्ण फिरायला जवळपास एक तास लागतो.

ह्या किल्ल्याचा इतिहास म्हणजे हा किल्ला यादव काळात बांधला गेला. तिसऱ्या दरवाजावरील पारसी भाषेतल्या शिलालेखानुसार, विजापूरच्या आदिलशाहने मे १५५६ मध्ये या किल्ल्याची डागडुजी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिडाच्या बांदल-देशमुखांच्या हातून हा किल्ला जिंकला. लढाईनंतर, बांदलचे मुख्य प्रशासक बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह अनेक अधिकारी स्वराज्य चळवळीत सामील झाले. पुरंदरच्या तहात महाराजांनी मुघलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये रोहिडाचा समावेश होता. २४ जून १६७० रोजी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला गेला. हा किल्ला भारत स्वातंत्र्य होईपर्यंत भोर राज्याच्या पंतसचिवांच्या ताब्यात होता.

किल्ल्यावर फिरुन झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आता ह्यावेळी काही तुफानी न करता सरळ मार्गाने परतायच ठरवल. वाटेत चांगले ३-४ ग्लास ताकाचे ग्लास रिजवले आणि एक तासाच्या आतच गड उतरलो. 

गावातुन आमच्या टेन्ट कॅंम्पला जाताना एक हातपंप लागला, पाणी छान थंडगार. हातपाय धुतले, तोंडावर पाणी मारल, पुर्ण थकवा निघुन मस्त मोकळ वाटल. कॅंम्पला पोहचलो तर जेवण तयारच होत. भुक तर लागलीच होती. लगेच जेवणावर ताव मारला. साधासुधा ट्रेक पण आमच्या अतरंगीपणा मुळे अगदीच साहसी करुन टाकला. 

कॅंम्पवर काही शेवटचे ग्रुप फोटो काढले आणि आमची गाडी आमच्या पुढच्या रोड ट्रीपसाठी निघाली.







Sunday 15 August 2021

आमची पहिली रोड ट्रीप - २

 ह्याच्या आधीचा भाग -

https://mefirista.blogspot.com/2021/07/blog-post.html


रोहीडा टेन्ट कॅंम्प हे बाजारवाडीला गावाच्या थोड्या आधी रस्त्याला लागुनच टेन्ट मध्ये राहण्याचा अनुभव घेण्यासाठी मस्त ठिकाण.

संध्याकाळचा चहा नाश्ता झाल्यावर, आमच्यासमोरच पाच मिनिटात त्यांनी आम्हाला आमचा टेन्ट बनवुन दिला. बाहेरुन छोटा वाटत होता पण आत ४ जण आरामात झोपु शकत होते. आम्ही शुक्रवारी आल्यामुळे आमचाच ग्रुप तिथे राहयला होता. पण १०-१२ तंबु आरामात उभे राहतील एवढी प्रशस्त जागा. पार्कींगची उत्तम सोय, जेवण्यासाठी, बसण्यासाठी पक्क बांधकाम तसेच आंघोळीची आणि बाथरुमचीही ठीकठाक सोय.

कॅंम्पच्या मागेच छोटी टेकडी आहे तिथुन सुर्यास्ताचा छान आनंद घेता येईल असे आम्हाला सांगितल आणि तसही आता काही करण्यासारख नव्हत. आम्ही १०-१५ मिनिटाच्या छोट्या पायपीटीनंतर त्या टेकडीवर पोहचलो. टेकडीवर आम्ही चौघेच. एका बाजुला रोहीडा किल्ल्याचा डोंगर, एका बाजुला खाली आमचा टेन्ट कॅंम्प, एकीकडे सुर्य अस्ताला चालला होता आणि ह्या बाजुला मांढरदेवीचा डोंगर. फोटो काढण्यासाठी मस्त जागा आणि कोणाचाही त्रास नाही, पाहीजे तसे मस्त फोटो काढले. सोलो, ग्रुप, ह्या पोज मध्ये, त्या पोज मध्ये, पुर्ण अर्धा तास फोटो काढत बसलो. कामच काय होत. सुर्य जसाजसा क्षितिजावर आला आम्ही निवांत बसलो सुर्य अस्ताला जाईपर्यंत आकाशात बदलणारे रंग त्या टेकडीवरच्या शांततेत आरामात पाहत बसलो. पुढच्या ट्रीपची ही प्लॅनिंग सुरु केली. कुठे जाता येईल. तो पर्यंत सुर्य दिसेनासा झाला आणि टेकडी उतरलो.

आता काय करायचे म्हणुन चौकशी केली की गावात आजूबाजूला अजुन काही बघण्यासारख आहे का तर गावात एक जुनी कुस्तीची तालीम आहे कळल. माझ्यातला पैलवान जागा झाला. आम्ही दोघेजण तालमीत जायला निघालो. गावात गाडी शिरल्यावर दोन मुलांना विचारल तालमीत कस जायच, ते पण चांगले तब्येतीने पैलवानच दिसत होते, त्यांनी सांगितल. आम्ही पोहचलो तिथे पण तालमीला कडी.

बाजुच्याला एकाला विचारल तालमीत जाऊ शकतो का तर ते जा म्हणाले. कडी खोलुन आत शिरलो. जुन्या पारंपरिक तालमीला नवीन साज दिला होता. आतमध्ये जुन्या दगडी बांधकामात तालीम होती तर बाजुने वाढीव बांधकाम करुन व्यायामशाळेचे नवीन साहीत्य बसवले होते. म्हणजे गाव नक्कीच बलोपासनेचे काळजी घेणारे होते. तेवढ्यात आम्ही ज्या मुलांना तालमीत कस यायच विचारल ते पण तिथेच आले. तालमीतच येत होते ते. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. त्यांनी व्यायामाला सुरुवात केली. तालमीतला रस्सा बघुन मला ही राहवले नाही आणि मी पण २-३ वेळा रस्सा चढलो. कुस्ती केली नाही मात्र, उगाच फिरायला आलो आहे कशाला. तालमीचा एक विडीयो बनवला. छान वेळ गेला. दोन नवे मित्र ही बनले.

कॅंम्पला परतल्यावर चांगला अंधार पडला होता. आकाश निरभ्र, छान चांदण्याच्या प्रकाशात आम्ही चौघे बसलो (समजुन घ्या). बार्बेक्यु मागवलं होत, मस्तच. छान १:३०-२ तास गेले. जेवल्यावर आपल्या तंबुत आलो. तंबुत पडल्यावर कधी झोपी गेलो कळलही नाही.

दुसऱ्यादिवशी मस्त फ्रेश होऊन ट्रेक पण करायचा आहे.







विडीयो लाॅग

https://youtu.be/G80qEwMqQgU

Sunday 18 July 2021

आमची पहिली रोड ट्रीप - १



 दिवसजवळपास ६०० किमीचा प्रवासत्यात ट्रेकिंगटेन्ट कॅम्पिंगसह्याद्रीचा निसर्गाने नटलेला घाट

धरणांचा जलाशयस्वच्छसमुद्रकिनारा आणि शांत मंदिरे आणि पुर्ण धमाल


शेवटी आम्ही मित्रांनी आमच्या रोड ट्रिपसाठी मार्ग निवडलापुर्ण देशभरातले पर्याय चाचपडुलेत्यामध्ये कन्याकुमारीरामेश्वरजयपुरलोणार आणि १५ दिवसाच्या प्रवासापासुन सुरु करत शेवटी आपला महाराष्ट्रातलाच  दिवसाचा (नंतर तो  झालामार्ग पक्का केला.कन्याकुमारीच जवळपास ठरवलच होत आम्ही पण १५ दिवस?? बर ते पण चालेल पण आॅफिसच काय? मग म्हटल आपल जवळच ३ दिवसापासुन चालु करु मग हळुहळु वाढवु. 


पहिला दिवस - नवी मुंबई ते बाजारवाडी


शुक्रवार सकाळी लवकरच नवी मुंबईवरून आम्ही चौघे निघालोआमच्यातल्याच एकाची गाडी होतीआम्ही तिघांनी तर शुक्रवारी सरळसुट्ट्या टाकल्या होत्या पण एकाला सुट्टी नव्हतीकाही हरकत नाहीवर्क फ्राॅम होम आहेच की मदतीलाआता ते वर्क घरुन करु किंवाप्रवास चालु असतानाकाय फरक पडतोकाम झाल्याशी मतलब आणि तसही तो शिक्षक असल्याने त्याला त्याचे शुक्रवारचे फक्त दोनलेक्चर्स घ्यायचे होते मग आम्ही लगेचच लोणावळ्यात आपला पहिला थांबा घेतलाएक चांगल हाॅटेल बघुन गाडी उभी केलीम्हणजेतो आपल लेक्चर गाडीत आरामात घेईल आणि आम्ही आपला नाश्ता करुत्यातच पाऊसाला पण सुरुवातडिसेंबर महिन्यात पाऊसम्हणजे काहीतरीच पण लोणावळा आणि पाऊस म्हणजे वाहवालोणावळ्याच्या सकाळच्या थंडगार वातावरणाचा आनंद लुटत नाश्ताझालात्यातच गप्पा गोष्टी रंगल्यावेगवेगळ्या वेब सिरीजवर चर्चा त्यात वेळ असा निघुन गेलात्याच एक लेक्चरही संपलत्याचानाश्ता झाल्यावर अजुन उरलेल्या एका लेक्चरला अवकाश होता


तिथुन पुढे आमचा कारवा निघालामग पुढचा मुक्काम परत एक्स्प्रेस हायवे संपल्यानंतर घेतलापावसाच वातावरण पुण्यातही होतचनाश्ता तर आधीच झाला होता तर मग चांगला गरम चहाचे झुरके घेतआम्ही त्याच्या लेक्चर संपण्याची वाट पाहत बसलो.

हे त्याच शेवटच लेक्चरआता काही काळजी नाहीआम्ही लोणावळ्याला असु तेव्हाच आम्ही जिथे टेन्ट कॅम्पिंगला रात्री मुक्कामीजाणार होतो त्यांनी चांगला एक नकाशाच पाठवला होता की वाटेत काय काय बघत येऊ शकतोत्यात पहिला ठिकाण होत बनेश्वर वनउद्यानपुणे सोडल्यावर खेड शिवापुर मग नसरापुर आणि तिथुनच आत - किमी वर बनेश्वर वन उद्यान


वनक्षेत्र  वन्यजीव अभयारण्य मध्ये वसलेले भगवान शंकरांचे मंदिरअगदी शांत आणि निवांत जागाह्याही आधी आम्ही चौघे तोरणाकिल्ल्यावर आलो होतो तेव्हा इथुनच पुढे गेलो पण आम्हाला तेव्हा ह्या वन उद्यानाची काही कल्पना नव्हतीह्या उद्यानात बरेचसे पक्षीफुलेवनस्पती आहेतया मंदिराच्या तलावामध्ये लाल कानाचे आणि मऊ कवच असलेले कासव आहेतमंदीराच्या चारही बाजुलावाहणाऱ्या पाण्याचे झरे आहेतया भागात धबधबा देखील आहे परंतु कोविड मुळे तो बंद होता आणि वन उद्यान पण बंदच होतफक्तमंदीर तेवढ दर्शनासाठी चालु होत.आम्ही महादेवांच दर्शन घेऊन मंदीर परिसर फिरुन बाहेर आलोह्या रोड ट्रीप पासुन मी व्हीलाॅगरव्हायच पण थरवल होतचला करुन बघु हा पण प्रयत्नतर तिथेच मंदीरात एक विडीयो पण शुट केला


बर ह्या परिसराच बऱ्याच जोडप्यांनाही आकर्षण आहे बर काआमची चौकस वृत्ती पटकन इकडे काय आहे बघु म्हणायची तर काहीजोडपे तिथे बसलेले डिस्टर्ब व्हायचेते तरी काय करणारवन उद्यान बंद नाहीतर त्यांनाही जागेची काही कमी नव्हती मग.

तिथुन निघेपर्यंत दुपार झाली होतीपुन्हा एकदा मुख्य मार्गाला लागल्यावर कापुरहोळला छानसं हाॅटेल बघुन जेवण केलबनेश्वरमंदीरात आधीच बराच वेळ घालवल्यामुळे मग आम्हाला पाठवलेल्या नकाशात असणाऱ्या प्रति बालाजी मंदीराचा बेत आम्ही रद्द केलाआणि भोरच्या रस्त्याला लागलोकापुरहोळ - भोरच्या रस्त्यात नेकलेस पाॅईंटला मग आमची गाडी थांबलीहा पाॅईंट आता तर खुपचफेमस आहेबऱ्याच सिनेमांमध्येही हा आता दिसतोइथे नीरा नदीच्या पात्राला नेकलेसच्या आकारात वळण मिळाला आहेफोटोकाढणाऱ्यांची तर नेहमीच गर्दीतरी आम्ही शुक्रवारी आलो होतो म्हणुन त्यातल्या त्यात बरतरीही आमच्या आधी आलेला एक ग्रुपमोक्याची जागा अडवुन बसला होतात्यामुळे आमचे फोटो चांगले येत नव्हतेबराच वेळ थांबुनही ते काही तिथुन निघायच नाव घेतनव्हतेबरआम्ही जिथुन फोटो काढत होतो तिथे त्यांनी ठेवलेल्या बॅगा आमच्या फ्रेम मध्ये येत होत्याशेवटी मी बोललो की तुमच्या बॅगतरी काढातेव्हा कुठ जाऊन ते बाजुला झाले आणि आम्ही आमचे मनसोक्त हवे तसे फोटो काढलेत्यानंतर आमच्या मागचे मगआमच्या नावाने मनातल्या मनात ओरडत बसले असतील


शेवटी मन शांत झाल्यावर आणि माझा विडीयो काढुन झाल्यावर आमच्या नकाश्यातला पुढचा स्पाॅट म्हणजे भाटघर धरणत्याचरस्त्याने पुढे आल्यावर भाटघर धरणाचा बांध दिसतो पण नक्की गाडी कुठ लावायची आणि धरणाजवळ कस जायच ते काही कळेनापुढून रस्ता असेल अस वाटल्यामुळे पुढ गेलोतिथे गावात एकाला विचारल तर त्याने एक छोटा रस्ता दाखवला जो थेट जलाशया जवळजातोजलाशयाजवळ पण एक चांगला फोटो शुट झाला


पुढे मग आमच भोरच्या नगरपरिषदेच्या कमानीने स्वागत केल

गुगल मॅप वर भोरचा राजवाडा टाकुन मॅप दाखवेल त्या भोरच्या गल्लीतुन आमची गाडी गेलीलोकेशन वर पोहचल्यावर समजल कीतिथेच नगरपरिषदेच कार्यालय पण आहे तर गर्दीच गर्दीगाडीच्या पार्कींगची जागा शोधण्यात वेळ गेला पण एकदाची जागा मिळाली.


राजवाड्याच्या दरवाजातुन आत गेलो तर तिथे पण आज कुठल तरी शुटींग होतत्याची आवारआवर चाललेलीआम्ही अजुन आत गेलोतर आम्हाला त्या राजवाड्याचा रखवालदार बाहेर काढायला लागलाही खाजगी मालमत्ता आहे लोकांसाठी खुली नाहीपंत सचिवांचीपरवानगी आणामग आत जावा.

त्याला खुप मिन्रतवाऱ्या केल्या आणि आतमध्ये फोटो काढणार नाही ह्या बोलीवर त्याने  मिनिटासाठी आम्हाला आत सोडलमस्तमोठा राजवाडा आहेआत गेल्या गेल्या समोर मध्यभागी दगडी सिंहासनचारही बाजुने खोल्याआतमध्ये डावीकडे गेल्यावर परतमोकळी जागा ज्यात तुळशी वृंदावननंतर एवढ्या खोल्या आणि रस्ते की भुलभुलय्याच वाटु लागतेहा राजवाडाही आता शुटींगलग्नसमारंभासाठी भाडेतत्त्वावर मिळतोबाजीराव मस्तानीचा शुट ही ह्याच राजवाड्यातला


राजवाड्यातुन बाहेर आल्यावर मग आता चहाची तलफ झाली त्यातच टेन्ट कॅम्पिंग मधुन पण फोन येऊन गेला कुठ पर्यंत पोहचले

भोर पासुन फक्त - किमीवर रोहीडा किल्ल्याच्या पायथ्याशी बाजारवाडी गावआमचा रात्रीचा मुक्काम तिथेच होतासरळ राजवाड्याच्या जवळच्या पार्कींगवरुन गाडी काढली आणि बाजारवाडीत पोहचलो आणि सगळ्यांनी मस्त गरमागरम कांदाभजी वर ताव मारला आणि चहाचे झुरके मारले.