Wednesday 25 December 2013

Corning Glass Museum

टुरचा शेवट आमचा कॉर्निंग ग्लास  संग्रहालयने झाला. इथे ग्लास बनविण्याचा कारखाना आहे असे  आम्हाला सांगण्यात आले .  तिथे पोहोचल्यावर समजले कि कारखाना कमी आणि ग्लास च्या वस्तु विकण्याची दुकान जास्त वाटत होत.
आम्हाला फ़क्त एक ग्लासची वस्तु कशी घडवली जाते ह्याचा प्रात्यक्षिक दाखवल. हयात काच गरम असताना त्याला आकर कसा देतात, त्याला रंग कसे दिले जातात, ह्या विषयी माहिती दिली गेली. आणि त्यानंतर पूर्ण वेळ त्यांच्या दुकानात घालवावा लागला.
कलाकृती अप्रतिम होती हे मान्य करावे लागेल परंतु त्याच्या किमती सुद्धा अप्रतिम होत्या. आम्ही कारखान्यात आलो होतो तर माझा समाज होता कि ह्या वस्तू इथेच बनविलेल्या असतील पण त्या तर सगळ्या कुठेतरी दुसरीकडे तयार केलेल्या होत्या मग प्रश्न असा होता कि नक्की ह्यांचा कारखाना कुठे आहे. असो थोडा वेळ तिथे फिरल्यावर आम्ही तिथून काहीही न घेता परतीच्या प्रवासाला निघलो.
शेवटी काहीही म्हणा २ दिवस मजा आली.