एका आठवड्याच्या शेवटी मी आणि माझी सुरेल दोघांनी अमेरिकेच्या राजधानीला भेट द्यायची ठरवलं. वॉशिंग्टन म्हंटला कि डोळ्यासमोर उभ राहत ते म्हणजे व्हाईट हाऊस, अब्राहम लिंकनचा पुतळा, वॉशिंग्टनचा मिनार. कुठल्याही सिनेमामध्ये वॉशिंग्टन शहर असेल तर सिनेमाची सुरुवात ह्याच गोष्टींनी होते. न्युयॉर्कपासुन तसं ४ तासांवर पण स्वतःची गाडी नसल्यास तयारी मात्र ४-५ आठवडयाआधीपासुनच करावी लागते. नाहीतर ऐनवेळी ट्रेन किंवा बसच्या तिकटांची किंमत अव्वाच्या सव्वा द्यावी लागते. आम्ही एक महिना आधीच एमट्रक ट्रेनची बुकिंग करुन ठेवली होती. ह्या ट्रेन विषयी ऐकल होत सर्विस खुपच छान आहे अगदी विमानात बसून गेल्यासारखा वाटत, म्हणुन म्हंटल चला जाऊन बघुया आणि आणखी एक समज होता कि बस पेक्षा नक्कीच लवकर पोहचु. पण हा समज साफ खोटा ठरला. बसला हि तेवढाच वेळ लागतो आणि काही खास अशी सर्विस नाही, इतर ट्रेन सारखीच ही ट्रेन. असो तर आम्ही शनिवारी सकाळची ट्रेन न्युयॉर्क वरून घेतली. प्रवास तसा चांगला झाला. आपल्या भारतीय रेल सारखं कोणी चहावाला, वडापाववाला फिरत नसल्यामुळे ट्रेनने प्रवास करतोय अस जाणवत नव्हत.
जवळपास ४ तासांनी आमची ट्रेन वॉशिंग्टन मधल्या युनिअन स्टेशनला आली. स्टेशनमध्येच थोडसं फ्रेश झाल्यावर मेन गेटने बाहेर आलो. बाहेर पडतानाच बिग बस टुर वाल्यांचा डेस्क होता जिथुन त्यांच्या कंपनीच्या बसची तिकीट घेऊन दिवसभर आरामात फिरू शकतो. यायच्या आधी मी इंटरनेट वर माहिती काढली होती आणि नकाशा बघितला होता. मी आधीच बिग बसची नकाश्याची प्रिंट आणली होती पण तिथे बोलताना मला आयता रंगीत नकाशा मिळाला. मी तिला बोललो आम्ही विचार करतो आणि मग येतो असा बोलुन तिथुन सटकलो. स्टेशनच्या बाहेर येऊन परत रंगीत नकाशा नीट न्याहळला. मधोमध राष्ट्रीय मॉल आणि त्याच्या एका टोकाला अमेरिकेची संसद, दुसऱ्या टोकाला अब्राहम लिंकन स्मृती स्थळ,
मधोमध वॉशिंग्टन मिनार, मिनारच्या एका बाजूला व्हाईट हाऊस आणि दुसऱ्या बाजुला जेफरसन स्मृती स्थळ आणि राष्ट्रीय मॉलच्या दोन्ही बाजूनी संग्रहालये आणि बरचसे इतर स्मृती स्थळ.
आम्ही स्टेशनच्या जवळच असणाऱ्या संसद पासून सुरुवात केली जिला अमेरिकेच्या भाषेत कॅपिटोल म्हणतात. आपल्या संसद इतकीच भव्य पण म्हणावी तशी सुरक्षा दिसली नाही. सगळे संसदेच्या आवारात आरामात फिरु शकत होते. बरीच लोक तर आवारात मस्तपणे जॉगिंग करत होते. तिथे थोडावेळ भटकल्यावर जवळच असणाऱ्या एअर अंड स्पेस संग्रहालयात गेलो. हे खुपच मोठ संग्रहालय आहे. ह्यात चंद्रावर गेलेले अपोलो यान, नील आर्मने चंद्रावर घातलेलं स्पेस सुट, जगातला पहिल्या विमानापासुनचा आत्तापर्यंतचा इतिहास अश्या बर्याच गोष्टी आहेत.जवळपास आमचे २-३ तास इथे आरामात गेले.
त्यानंतर आम्ही पुढच्या स्मिथ्सोनिअन कॅसलला गेलो. जर तुम्ही नाईट एट म्युझिअम २ हा सिनेमा पहिला असेल तर हे संग्रहालय फिरताना अजुन मजा वाटेल कारण तो पुर्ण सिनेमा इथल्याच म्युझिअमस वर आहे. त्या नंतर अजून दोन म्युझिअम फिरलो, एवढा वेळ चालुन चालुन पायांची बरीच वाट लागली होती. हिवाळ्याचे दिवस असल्याने अंधार हि लवकर पडला होता. आम्ही ६ वाजताच आमच्या हॉटेल मध्ये गेलो आणि आरामात संध्याकाळ घालवली.
रात्री ८ च्या दरम्यान जवळपास कोणते हॉटेल आहेत हे बघुन बाहेर जेवायला आलो. एक भारतीय हॉटेल होत पण ते नकाशात जिथे दाखवला होता तिथे गेल्यावर भेटलं नाही, तिथेच एक गार्ड उभी होती तिला आम्ही विचारलं. तिने सांगितल कि बाजुच्या शॉपिंग मॉलमध्ये ते आहे पण आता ते बंद झालं आणि ती स्वतः हून आम्हाला जवळपासचे चांगले हॉटेल्स सांगू लागली. तिने मध्ये तर तिच्या वॉकीटॉकी वरुन कोणाशी तरी बोलुन आम्हाला आणखी जागा सुचवली. आम्ही तीचे आभार मानुन निघालो आणि शेवटी डोनाल्डस मध्ये बर्गर वर आमची भुक मिटवली.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच दिवस चालु केला. सर्वप्रथम व्हाईट हाऊसला गेलो. आम्ही हाऊसच्या मागच्या बाजुला होतो. बरेच जण तिथे फोटो काढत होते. थोडा वेळ घालवल्यावर पुढच्या बाजूला आलो. त्या नंतर वॉशिंग्टन मिनारचे फोटो आणि मग अब्राहम लिंकन स्मृतीस्थळाकडे निघालो. वाटेतच दुसऱ्या महायुद्धाचा मेमोरियल आहे.सगळ्याच स्मृती स्थळांची रचना अगदी उत्तम आहे. अब्राहम लिंकनचा भव्य पुतळा तर आपण सगळ्यांनी सिनेमामध्ये पहिलाच आहे. एकदम करारी अशी नजर, उत्तम व्यक्तिमत्व त्यांच्या पुतळ्यातुन साकारण्यात आली आहे. तिथल्याच पायऱ्यांवर थोडासा आराम केल्यावर आम्ही पुढे गेलो. रस्त्यात कोरियन युद्धाचा मेमोरिअल आहे आणि पुढे अमेरिकेतल्या वर्णद्वेषा विरुद्ध लढणाऱ्या मार्टिन ल्युथर किंगचा मेमोरिअल. समोरच एक तलाव आहे ज्याच्या बाजूने चेरीचे झाडे लावलेली आहे. वसंत ऋतूत इथे चेरी ब्लोस्सम बघायला दुरून लोक येतात. जेव्हा ह्या सर्व झाडांना चेरीचा मोहोर येतो तेव्हा इथला निसर्ग बघण्यासारखा असतो. अजून पुढे जाताना वाटेत अमेरिकेचे दुसऱ्या महायुद्धात नेर्तुत्व करणाऱ्या राष्ट्राध्यक्ष फ्रान्क्लीन रुस्वेल्तचा स्मृती स्थळ आहे.
शेवटी बरीच पायपीट करून आम्ही एकदाचे जेफरसन मेमोरिअलला पोहोचलो. तिथे जेफरसनचा एक पूर्णाकृती उभा पुतळा आहे. त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
आमच्या कडे अजुन बराच वेळ होता मग एका पार्कात जिथे आईस स्केटिंग सुरु होता तिथे बसलो १-२ तास वेळ घालवल्यावर आम्ही ट्रेन मध्ये परतीच्या प्रवासाला निघालो.
ज्यांना अमेरिकेच्या इतिहासात रस आहे आणि २ दिवस चांगली पायपीट करण्याची इच्छा आहे त्यांनी ही राजधानी भेट नक्कीच द्यावी.
मधोमध वॉशिंग्टन मिनार, मिनारच्या एका बाजूला व्हाईट हाऊस आणि दुसऱ्या बाजुला जेफरसन स्मृती स्थळ आणि राष्ट्रीय मॉलच्या दोन्ही बाजूनी संग्रहालये आणि बरचसे इतर स्मृती स्थळ.
आम्ही स्टेशनच्या जवळच असणाऱ्या संसद पासून सुरुवात केली जिला अमेरिकेच्या भाषेत कॅपिटोल म्हणतात. आपल्या संसद इतकीच भव्य पण म्हणावी तशी सुरक्षा दिसली नाही. सगळे संसदेच्या आवारात आरामात फिरु शकत होते. बरीच लोक तर आवारात मस्तपणे जॉगिंग करत होते. तिथे थोडावेळ भटकल्यावर जवळच असणाऱ्या एअर अंड स्पेस संग्रहालयात गेलो. हे खुपच मोठ संग्रहालय आहे. ह्यात चंद्रावर गेलेले अपोलो यान, नील आर्मने चंद्रावर घातलेलं स्पेस सुट, जगातला पहिल्या विमानापासुनचा आत्तापर्यंतचा इतिहास अश्या बर्याच गोष्टी आहेत.जवळपास आमचे २-३ तास इथे आरामात गेले.
रात्री ८ च्या दरम्यान जवळपास कोणते हॉटेल आहेत हे बघुन बाहेर जेवायला आलो. एक भारतीय हॉटेल होत पण ते नकाशात जिथे दाखवला होता तिथे गेल्यावर भेटलं नाही, तिथेच एक गार्ड उभी होती तिला आम्ही विचारलं. तिने सांगितल कि बाजुच्या शॉपिंग मॉलमध्ये ते आहे पण आता ते बंद झालं आणि ती स्वतः हून आम्हाला जवळपासचे चांगले हॉटेल्स सांगू लागली. तिने मध्ये तर तिच्या वॉकीटॉकी वरुन कोणाशी तरी बोलुन आम्हाला आणखी जागा सुचवली. आम्ही तीचे आभार मानुन निघालो आणि शेवटी डोनाल्डस मध्ये बर्गर वर आमची भुक मिटवली.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच दिवस चालु केला. सर्वप्रथम व्हाईट हाऊसला गेलो. आम्ही हाऊसच्या मागच्या बाजुला होतो. बरेच जण तिथे फोटो काढत होते. थोडा वेळ घालवल्यावर पुढच्या बाजूला आलो. त्या नंतर वॉशिंग्टन मिनारचे फोटो आणि मग अब्राहम लिंकन स्मृतीस्थळाकडे निघालो. वाटेतच दुसऱ्या महायुद्धाचा मेमोरियल आहे.सगळ्याच स्मृती स्थळांची रचना अगदी उत्तम आहे. अब्राहम लिंकनचा भव्य पुतळा तर आपण सगळ्यांनी सिनेमामध्ये पहिलाच आहे. एकदम करारी अशी नजर, उत्तम व्यक्तिमत्व त्यांच्या पुतळ्यातुन साकारण्यात आली आहे. तिथल्याच पायऱ्यांवर थोडासा आराम केल्यावर आम्ही पुढे गेलो. रस्त्यात कोरियन युद्धाचा मेमोरिअल आहे आणि पुढे अमेरिकेतल्या वर्णद्वेषा विरुद्ध लढणाऱ्या मार्टिन ल्युथर किंगचा मेमोरिअल. समोरच एक तलाव आहे ज्याच्या बाजूने चेरीचे झाडे लावलेली आहे. वसंत ऋतूत इथे चेरी ब्लोस्सम बघायला दुरून लोक येतात. जेव्हा ह्या सर्व झाडांना चेरीचा मोहोर येतो तेव्हा इथला निसर्ग बघण्यासारखा असतो. अजून पुढे जाताना वाटेत अमेरिकेचे दुसऱ्या महायुद्धात नेर्तुत्व करणाऱ्या राष्ट्राध्यक्ष फ्रान्क्लीन रुस्वेल्तचा स्मृती स्थळ आहे.
शेवटी बरीच पायपीट करून आम्ही एकदाचे जेफरसन मेमोरिअलला पोहोचलो. तिथे जेफरसनचा एक पूर्णाकृती उभा पुतळा आहे. त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
आमच्या कडे अजुन बराच वेळ होता मग एका पार्कात जिथे आईस स्केटिंग सुरु होता तिथे बसलो १-२ तास वेळ घालवल्यावर आम्ही ट्रेन मध्ये परतीच्या प्रवासाला निघालो.
ज्यांना अमेरिकेच्या इतिहासात रस आहे आणि २ दिवस चांगली पायपीट करण्याची इच्छा आहे त्यांनी ही राजधानी भेट नक्कीच द्यावी.
Nice article...!!!
ReplyDeleteWell organized and appropriately connected.
Keep it up...!!!
Thanks ☺️☺️☺️
Delete