दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे आम्ही सगळे आवरून तयार झालो. चहा झाल्यावर हॉटेलमधुन निघायची लगबन सुरू झाली. तोवर बऱ्यापैकी उजाडल होत. हॉटेल टेकडीवर असल्याने सकाळचा तो निसर्गरम्य परिसर मन प्रसन्न करणारा होता. थोडे फोटो टिपुन झाल्यावर 'गणपती बाप्पा मोरया' करून आम्ही रांजणगावाच्या दिशेने निघालो.
वाटेतच पोटभर नाश्ता करुन रांजणगाव, जे आता गाव राहिल नसुन एक चांगल औद्योगिक नगर झाल होत तिथे पोहचलो. मंदिराचा तर कायापालट केला आहे. भोवताली बाग, महागणपतीची चित्ररूपी कथा, दर्शन बारी, भक्त निवास अगदीच छान. इथे दर्शनाला थोडीफार गर्दी होती. दर्शन झाल्यावर परिसराचे पटापट फोटो काढले. मंदिराबाहेरच्या बाजारातुन घासाघिस करून आवळे, काकड्या असा सटरफटर खरेदी करुन आम्ही परतलो. आता पुढचा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर. गणपती बाप्पा मोरया.
ओझरला पोहचायला १-१:३० तास होता. वाटेत सगळ्यांना मी महागणपतीची आणि विघ्नेश्वराची कथा ऐकवली. ओझरला पोहचलो तर ओझरही आता पुर्वी सारख नव्हत. मंदीराभोवतालची भक्कम तटबंदी आधी दुरूनच उठुन दिसायची पण आता हिच तटबंदी परिसरात उभ्या राहिलेल्या इतर इमारतींमध्ये झाकुन गेली आहे. पार्किंग मधल्या गाड्या बघुन वाटले की खुप गर्दी असेल पण सुदैवाने ती अजिबात नव्हती. दर्शनानंतर जेवण झाल आणि लेण्याद्रीला निघालो.
लेण्याद्री, यात्रेतला आमचा शेवटचा गणपती. मंदीर डोंगरातल्या लेण्यांमध्ये असुन चढण बरच आहे. वाटेत असणारी माकडे तर भाविकांना हैराण करून सोडतात. हातातील पाण्याची बाटली, पिशव्या ते सर्रास खेचतात. चढताना जरा सावधच राहव लागत. मंदीर म्हणजे डोंगराचा दगड पोखरून बनवलेली लेणी आणि त्यात गिरिजात्मजाची स्वयंभु मुर्ती. दर्शन घेऊन खाली उतरताना पुन्हा माकडांपासुन लांब राहण्याचा प्रयत्न केला. उतरल्यावर मस्त चहा मारुन परतीच्या प्रवासाला निघालो.
अष्टविनायकाची यात्रा ही ज्या गणपतीच्या दर्शनानंतर सुरू केली त्याच गणपतीच्या दर्शनाने शेवट करायाचा असतो असे कुठे तरी ऐकले होते म्हणुन पुन्हा वरदविनायकाच दर्शन घेतल आणि आमच्या यात्रेचा शेवट झाला.
#अष्टविनायक #रांजणगाव #महागणपती #ओझर #विघ्नेश्वर #लेण्याद्री #गिरिजात्मज
#Ashtvinayak #ranjangaon #mahaganpati #ojhar #vighneshwar #lenyadri #girijatmaj
No comments:
Post a Comment