नायगराला पोहचण्यापूर्वी आमची टुर गाईड पुन्हा सुरु झाली. तिने माईक हातात घेतला आणि आम्हाला सूचना देण्यास सुरुवात केली. ह्या वीकेंडला खूप गर्दी आहे. जवळपास ५० बसेस आल्या आहेत आणि प्रत्येक बस मध्ये ५० जन आहेत तूर विचार करा किती गर्दी असेल. तुम्ही बस मधून उतरल्यावर मला फॉलो करा. माझ्या हातात लाल कलरची छत्री असेल तिला बघून माझ्या मागे मागे या. मी तुम्हाला तिकीट देईन आणि तुम्ही सर्वात पहिले बोट पकडा. जाताना ज्या रस्त्याने जाल येताना पण त्याच रस्त्याने परत याल तर परत येतान फोटो काढा.
असे जवळपास हजार सूचना दिल्यावर ती शेवटी शांत झाली आणि आमची बस नायगरा स्टेट पार्कला पोहोचली. ड्रोप पोइन्तला सोडून ती बस पार्किंग लॉट मध्ये निघून गेली. आमच्या मादामने पण छत्री उघडली आणि चालू लागली. तिच्या मागे मागे आम्ही ५० जण. तिकीट बुथला पोहचल्यावर तिने आपली लाल छत्री बंद केली आणि मागे बघितला तर ५० पैकी फक्त २० जण तिथे होते. तिने एका ग्रुपला फोन केला आणि ओरडू लागली आणि बोलत होती 'Do you see my red umbrella?'. माझा मित्र बोलला 'अरे आधी छत्री तर ओपन कर'.
थोडा वेळ बाकीच्यांची वाट बघितल्यावर तिने आम्हाला आमचे तिकीट दिले. आम्ही तिकीट घेऊन आत रांगेत गेलो. रांग बरीच मोठी होती पण पटापट पुढे सरकत होती. आम्ही जिथे उभे होतो तो एक मोठा डेक होता, तिथून आम्हाला लिफ्ट घेऊन २०० फुट खाली जायचे होते. त्या डेकच्या एका बाजूला नायगारा धबधबा खळाळत २०० फुट उंची वरून खाली पडत होता आणि दुसर्या बाजूला अमेरिका आणि कॅनडा ला जोडणारा रेन्बो ब्रिज दिसत होत. ब्रिजच्या बरोबर मध्ये दोन्ही देशाचे ध्वज फडकत होते. नायगारा नदी ही दोन्ही देशाची सीमा आहे, नदीच्या एका बाजूला अमेरिका जिथे आम्ही होतो आणि दुसर्याबाजूला कॅनडा. ब्रिजच्या मधले ध्वज हे सीमा दर्शवत होते.
पुढच्या पाच मिनिटात आम्ही लिफ्ट मधुन खाली आलो. लिफ्ट मधून बाहेर आल्यावर आमची तिकीट चेक करण्यात आली आणि पुढे आम्हाला रेनकोट दिला गेला. रेनकोट साधा पोन्चो सारखा होता, हात बाहेर येण्यासाठी दोन बाह्या आणि डोक्यावर एक टोपी येईल असा, शरीरभर तो निळ्या रंगाचा पोन्चो. चालत चालतच तो अंगावर मी चढवला आणि बोटीच्या रांगेत उभा राहिलो. प्रत्येक १५-२० मिनुताला एक बोट होती, तिथेही जास्त वेळ उभा राहावा लागला नाही, बोट आल्यावर लगेचच आम्हाला आत मध्ये चढवण्यात आले आणि बोट निघलि.
नायगारा मध्ये एकूण ३ धबधबे आहेत. पहिला अमेरिकन, दुसरा ब्रायडल वेल जे दोन्ही पूर्णपणे अमेरिकन हद्दीत येतात आणि तिसरा सर्वात महत्वाचा होर्शु जो कॅनेडा साईड ला आहे. पहिल्यांदा आमची बोट अमेरिकन फाल्ल्स समोरून गेलि. अमेरिकन फाल्ल्स ची उंची तुलनेने इतरांपेक्षा कमी आहे . बऱ्यापैकी उंचीवरून पाणी पडत होत. वर आकाशात सुर्य तळपत होत. त्याची किरणे धबधब्याच्या पाण्यावर पडून तिथे सुंदर असा इंद्रधनुष्य तयार झाला होता. पुढे आमची बोट ब्रायडल वेल धबधब्यासमोर आलि. ह्या धबधब्याची उंची अमेरिकन पेक्षा थोडी जास्त असेल पुन रुंदी खूपच कमी आहे. ह्या धबधब्याच्या पाण्यात पर्यटक मनसोक्त भिजू शकतात केव ऑफ विंड मार्गे. शेवटी आम्ही होर्शु धबधब्याजवळ आलो. हा सर्वात मोठा, उंची आणि रुंदी लाही . वातावरणात ह्यातून पाणी पडण्याचा आवाज गर्जत होता . जसजसे आम्ही अजून जवळ गेलो तसे पाण्याचे तुषार आमच्या अंगावूर उडू लागले . ह्याच्या साठीच तूर इतक्या दूर आलो होतो. बोट जितक्या जवळ जाता येईल तितक्या जवळ घेऊन गेली . जवळजवळ ५ मिनिटे आम्ही तिथे होतो. मी पोंचो घट्ट बांधण्याचा प्रयत्न केला तरीही पाणी आत जाताच होत. शेवटी मी तो डोक्यावरून उतरवला आणि कमेरा भोवती गुंडाळला आणि मनसोक्त भिजलो .
No comments:
Post a Comment