Sunday, 18 July 2021

आमची पहिली रोड ट्रीप - १



 दिवसजवळपास ६०० किमीचा प्रवासत्यात ट्रेकिंगटेन्ट कॅम्पिंगसह्याद्रीचा निसर्गाने नटलेला घाट

धरणांचा जलाशयस्वच्छसमुद्रकिनारा आणि शांत मंदिरे आणि पुर्ण धमाल


शेवटी आम्ही मित्रांनी आमच्या रोड ट्रिपसाठी मार्ग निवडलापुर्ण देशभरातले पर्याय चाचपडुलेत्यामध्ये कन्याकुमारीरामेश्वरजयपुरलोणार आणि १५ दिवसाच्या प्रवासापासुन सुरु करत शेवटी आपला महाराष्ट्रातलाच  दिवसाचा (नंतर तो  झालामार्ग पक्का केला.कन्याकुमारीच जवळपास ठरवलच होत आम्ही पण १५ दिवस?? बर ते पण चालेल पण आॅफिसच काय? मग म्हटल आपल जवळच ३ दिवसापासुन चालु करु मग हळुहळु वाढवु. 


पहिला दिवस - नवी मुंबई ते बाजारवाडी


शुक्रवार सकाळी लवकरच नवी मुंबईवरून आम्ही चौघे निघालोआमच्यातल्याच एकाची गाडी होतीआम्ही तिघांनी तर शुक्रवारी सरळसुट्ट्या टाकल्या होत्या पण एकाला सुट्टी नव्हतीकाही हरकत नाहीवर्क फ्राॅम होम आहेच की मदतीलाआता ते वर्क घरुन करु किंवाप्रवास चालु असतानाकाय फरक पडतोकाम झाल्याशी मतलब आणि तसही तो शिक्षक असल्याने त्याला त्याचे शुक्रवारचे फक्त दोनलेक्चर्स घ्यायचे होते मग आम्ही लगेचच लोणावळ्यात आपला पहिला थांबा घेतलाएक चांगल हाॅटेल बघुन गाडी उभी केलीम्हणजेतो आपल लेक्चर गाडीत आरामात घेईल आणि आम्ही आपला नाश्ता करुत्यातच पाऊसाला पण सुरुवातडिसेंबर महिन्यात पाऊसम्हणजे काहीतरीच पण लोणावळा आणि पाऊस म्हणजे वाहवालोणावळ्याच्या सकाळच्या थंडगार वातावरणाचा आनंद लुटत नाश्ताझालात्यातच गप्पा गोष्टी रंगल्यावेगवेगळ्या वेब सिरीजवर चर्चा त्यात वेळ असा निघुन गेलात्याच एक लेक्चरही संपलत्याचानाश्ता झाल्यावर अजुन उरलेल्या एका लेक्चरला अवकाश होता


तिथुन पुढे आमचा कारवा निघालामग पुढचा मुक्काम परत एक्स्प्रेस हायवे संपल्यानंतर घेतलापावसाच वातावरण पुण्यातही होतचनाश्ता तर आधीच झाला होता तर मग चांगला गरम चहाचे झुरके घेतआम्ही त्याच्या लेक्चर संपण्याची वाट पाहत बसलो.

हे त्याच शेवटच लेक्चरआता काही काळजी नाहीआम्ही लोणावळ्याला असु तेव्हाच आम्ही जिथे टेन्ट कॅम्पिंगला रात्री मुक्कामीजाणार होतो त्यांनी चांगला एक नकाशाच पाठवला होता की वाटेत काय काय बघत येऊ शकतोत्यात पहिला ठिकाण होत बनेश्वर वनउद्यानपुणे सोडल्यावर खेड शिवापुर मग नसरापुर आणि तिथुनच आत - किमी वर बनेश्वर वन उद्यान


वनक्षेत्र  वन्यजीव अभयारण्य मध्ये वसलेले भगवान शंकरांचे मंदिरअगदी शांत आणि निवांत जागाह्याही आधी आम्ही चौघे तोरणाकिल्ल्यावर आलो होतो तेव्हा इथुनच पुढे गेलो पण आम्हाला तेव्हा ह्या वन उद्यानाची काही कल्पना नव्हतीह्या उद्यानात बरेचसे पक्षीफुलेवनस्पती आहेतया मंदिराच्या तलावामध्ये लाल कानाचे आणि मऊ कवच असलेले कासव आहेतमंदीराच्या चारही बाजुलावाहणाऱ्या पाण्याचे झरे आहेतया भागात धबधबा देखील आहे परंतु कोविड मुळे तो बंद होता आणि वन उद्यान पण बंदच होतफक्तमंदीर तेवढ दर्शनासाठी चालु होत.आम्ही महादेवांच दर्शन घेऊन मंदीर परिसर फिरुन बाहेर आलोह्या रोड ट्रीप पासुन मी व्हीलाॅगरव्हायच पण थरवल होतचला करुन बघु हा पण प्रयत्नतर तिथेच मंदीरात एक विडीयो पण शुट केला


बर ह्या परिसराच बऱ्याच जोडप्यांनाही आकर्षण आहे बर काआमची चौकस वृत्ती पटकन इकडे काय आहे बघु म्हणायची तर काहीजोडपे तिथे बसलेले डिस्टर्ब व्हायचेते तरी काय करणारवन उद्यान बंद नाहीतर त्यांनाही जागेची काही कमी नव्हती मग.

तिथुन निघेपर्यंत दुपार झाली होतीपुन्हा एकदा मुख्य मार्गाला लागल्यावर कापुरहोळला छानसं हाॅटेल बघुन जेवण केलबनेश्वरमंदीरात आधीच बराच वेळ घालवल्यामुळे मग आम्हाला पाठवलेल्या नकाशात असणाऱ्या प्रति बालाजी मंदीराचा बेत आम्ही रद्द केलाआणि भोरच्या रस्त्याला लागलोकापुरहोळ - भोरच्या रस्त्यात नेकलेस पाॅईंटला मग आमची गाडी थांबलीहा पाॅईंट आता तर खुपचफेमस आहेबऱ्याच सिनेमांमध्येही हा आता दिसतोइथे नीरा नदीच्या पात्राला नेकलेसच्या आकारात वळण मिळाला आहेफोटोकाढणाऱ्यांची तर नेहमीच गर्दीतरी आम्ही शुक्रवारी आलो होतो म्हणुन त्यातल्या त्यात बरतरीही आमच्या आधी आलेला एक ग्रुपमोक्याची जागा अडवुन बसला होतात्यामुळे आमचे फोटो चांगले येत नव्हतेबराच वेळ थांबुनही ते काही तिथुन निघायच नाव घेतनव्हतेबरआम्ही जिथुन फोटो काढत होतो तिथे त्यांनी ठेवलेल्या बॅगा आमच्या फ्रेम मध्ये येत होत्याशेवटी मी बोललो की तुमच्या बॅगतरी काढातेव्हा कुठ जाऊन ते बाजुला झाले आणि आम्ही आमचे मनसोक्त हवे तसे फोटो काढलेत्यानंतर आमच्या मागचे मगआमच्या नावाने मनातल्या मनात ओरडत बसले असतील


शेवटी मन शांत झाल्यावर आणि माझा विडीयो काढुन झाल्यावर आमच्या नकाश्यातला पुढचा स्पाॅट म्हणजे भाटघर धरणत्याचरस्त्याने पुढे आल्यावर भाटघर धरणाचा बांध दिसतो पण नक्की गाडी कुठ लावायची आणि धरणाजवळ कस जायच ते काही कळेनापुढून रस्ता असेल अस वाटल्यामुळे पुढ गेलोतिथे गावात एकाला विचारल तर त्याने एक छोटा रस्ता दाखवला जो थेट जलाशया जवळजातोजलाशयाजवळ पण एक चांगला फोटो शुट झाला


पुढे मग आमच भोरच्या नगरपरिषदेच्या कमानीने स्वागत केल

गुगल मॅप वर भोरचा राजवाडा टाकुन मॅप दाखवेल त्या भोरच्या गल्लीतुन आमची गाडी गेलीलोकेशन वर पोहचल्यावर समजल कीतिथेच नगरपरिषदेच कार्यालय पण आहे तर गर्दीच गर्दीगाडीच्या पार्कींगची जागा शोधण्यात वेळ गेला पण एकदाची जागा मिळाली.


राजवाड्याच्या दरवाजातुन आत गेलो तर तिथे पण आज कुठल तरी शुटींग होतत्याची आवारआवर चाललेलीआम्ही अजुन आत गेलोतर आम्हाला त्या राजवाड्याचा रखवालदार बाहेर काढायला लागलाही खाजगी मालमत्ता आहे लोकांसाठी खुली नाहीपंत सचिवांचीपरवानगी आणामग आत जावा.

त्याला खुप मिन्रतवाऱ्या केल्या आणि आतमध्ये फोटो काढणार नाही ह्या बोलीवर त्याने  मिनिटासाठी आम्हाला आत सोडलमस्तमोठा राजवाडा आहेआत गेल्या गेल्या समोर मध्यभागी दगडी सिंहासनचारही बाजुने खोल्याआतमध्ये डावीकडे गेल्यावर परतमोकळी जागा ज्यात तुळशी वृंदावननंतर एवढ्या खोल्या आणि रस्ते की भुलभुलय्याच वाटु लागतेहा राजवाडाही आता शुटींगलग्नसमारंभासाठी भाडेतत्त्वावर मिळतोबाजीराव मस्तानीचा शुट ही ह्याच राजवाड्यातला


राजवाड्यातुन बाहेर आल्यावर मग आता चहाची तलफ झाली त्यातच टेन्ट कॅम्पिंग मधुन पण फोन येऊन गेला कुठ पर्यंत पोहचले

भोर पासुन फक्त - किमीवर रोहीडा किल्ल्याच्या पायथ्याशी बाजारवाडी गावआमचा रात्रीचा मुक्काम तिथेच होतासरळ राजवाड्याच्या जवळच्या पार्कींगवरुन गाडी काढली आणि बाजारवाडीत पोहचलो आणि सगळ्यांनी मस्त गरमागरम कांदाभजी वर ताव मारला आणि चहाचे झुरके मारले.









Wednesday, 15 April 2020

कानडी मुलगी आणि कन्नड

आम्ही एकदा आमच्या ऑफिस मित्रांनी कुर्गची सहल काढली. म्हणजे आम्ही ७ जण फक्त. बाकीच्या ६ जणांचा बॉस मीच होतो म्हणुन सुट्टी तर मिळणारच होती. 

गुगल मॅपवर पुर्ण भारतभ्रमंती केल्यावर आम्ही सर्वांनी कुर्ग निवडलं. सहल कमी दिवसात आटपत होती आणि मुख्य म्हणजे विमानाने जाऊनही  स्वस्तात पडत होती. ह्याचे पुर्ण श्रेय आमच्या "झपरी प्लॅनर्स" ग्रुपला. 

झपरी प्लॅनर्स हे आमच्या ऑफिस मधले स्वयंघोषित इव्हेंट मॅनेजमेंट टीम आहे. त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या ऑफिस मधले सगळे इव्हेंट्स अगदी उत्तमरीत्या 'कुठलाही वादविवाद न होता' पार पाडणे. पण आता इव्हेंट म्हंटलं तर वाद हा आलाच (कुठलाही असो, ऑफ़िसचाच असं नाही) आणि त्यात माझ्यासारखे काही नग असले की नसलेले वाद ही उकरुन काढायचे आणि मग तो आपणच मिटवल्याचा भास निर्माण करायचा. त्याशिवाय मजा नाही. 

असो पण ही कुर्गची सहल मात्र अगदी उत्तमरित्या आमच्या लाडक्या झपरी प्लॅनर्सने आयोजित केली कुठलाही वाद न होता. म्हणजे आम्ही गेलोच ७ जण होतो तर कसला वाद आणि मी बराच प्रयत्न ही केला पण माझे सगळे पासे त्यांनी उलटे पाडले. उलटा मीच त्यांच्या तावडीत बऱ्याचवेळा सापडलो. त्यातलाच एक प्रसंग.

आम्ही कुर्गला पोहचल्यावर दुसऱ्या दिवशी कुठल्याश्या मंडलपट्टी नावाच्या शिखरावर जाणार होतो.शिखरावरुन उतरताना पाऊस सुरु झाला. पाऊस धोधो  व्हायच्या आधी आम्ही गाडी पार्किंग जवळ तर पोहचलो पण तिथे आपली साधी गाडी जात नसल्यामुळे आम्ही पिकअप करुन आलो होतो. 
पिकमध्ये पुढे केबिन ज्यात ५ जण बसु शकतात आणि मागे ओपन.

आता आतमध्ये सगळे बसल्यावर आम्ही ३ जण मागेच बसणार होतो आणि पाऊस एवढा आणि त्यात रस्ता पण खाचखळग्यांचा. बाजुनेच तेव्हा अजुन एक जीप चालली होती आणि त्यात दोनच जण होते तेव्हा आमच्या ड्राइवरला सांगितलं, त्याला तुझ्या भाषेत विचार आणि बघ आम्हाला तिघांना घेतो का तो पुढे चौकापर्यंत. रस्ता तिथपर्यंतच खराब आहे आणि चौकात चहाच्या टपऱ्या आहेत तर तिथे आरामात बसता येईल पाऊस जाई पर्यंत. 
आमच्या ड्राइवरने बाजुच्या जीपवाल्याला थांबवलं आणि मग ते दोघे त्यांच्या मातृभाषेत २-३ मिनिटे बोलले. 
काय बोलले एक चकार आम्हाला कळलं नाही पण शेवटी आम्हाला त्या जीप मध्ये बसायला परवानगी मिळाली. 

१०-१५ मिनिटानंतर आम्ही चौकात पोहचलो. त्याने तर एकदम विमान उडवल्यासारखी जीप तिथे आणली. आम्हाला उतरवला आणि निघुन गेला. आमचा पिकअपवाला आणि त्यातली आमची अर्धी मंडळी बरेच मागे राहिले होते. आता तुम्ही विमनातुन आल्यावर असच होणार. 
तोपर्यंत पाऊसही थांबला होता मग आम्ही तिघे, मुलेच होतो, तिकडे टाइमपास करु लागलो. चौकात ३-४ चहाच्या टपऱ्यांव्यतिरिक्त काहीही नव्हतं. आम्ही चौकाच्या मधोमध उभं राहुन मागच्या पिकअपची वाट बघत होतो. 
तेवढ्यात एका टपरीतून एक कानडी सुंदरी बाहेर आली. आमच्या दिशेने रोखुन तिने बोलायला सुरुवात केली. 
अर्थात कानडी भाषेत. 
मी थोडा गोंधळलो. मी माझ्या सहकाऱ्याला विचारलं,  "काय बोलतेय ही?"
"चाय पिनेको बुला रही होगी"
तीच आपलं चालुच होतं
"नही, मुझे लगता है कुछ और बोल रही है"
माझा सहकारी, "और क्या बोलेगी "
"शायद बोल रही होगी की आपकी गाडी आने तक बैठो यहा पे, मेरी पर्सनॅलिटी देखके"
माझा सहकारी, "पुछो आप"
मी मग बळच हसलो, एकतर टिपिकल भारतीय 'साऊथची' मुलगी एवढं आपल्याशी बोलतेय आणि भाषेची अडचण. तिच्याकडे बघुन बोललो "नो कन्नड"
तरीही ती थांबेना. 
मग मी थोडासा धीर करुन अजुन जोरात बोललो "नो कन्नड"
तेव्हा ती, "नो नो" असा बोलुन "तुझ्या मागे" असा हाताचा इशारा केला. 
मी मागे वळुन बघितला तर ती मागच्या चहाच्या टपरीवाल्याबरोबर बोलत होती. 
पोपट बोलतात तो, खुप मोठा पोपट.
मी गप मान खाली घालुन दुसरीकडे वळालो. 
माझे दोन्ही सहकाऱ्यांना तर चांगलीच संधी मिळाली. जे मला चिडवलं त्यांनी. फक्त रस्त्यावर लोळायचे राहिले होते हसताना. 

मी तर मनोमन ठरवलं इथुन पुढे आपल्याला वाटलं की कोणी अनोळख्या भाषेत आपल्याशी बोलतंय तर आधी दाही दिशांना नजर फिरवायची आणि खात्री करुन घ्या, नक्की आपल्याशीच बोलतेय ना. 

त्या दोघांना बोललो, "बस अभी"
तरीही त्यांचं थांबायचं नाव नाही. 
"में बॉस हुं तुम्हारा, चुप अभी"
तरीही काही फायदा नाही झाला. मागुन आमची गाडी आली तर ह्या कार्ट्यांनी पहिल्यांदा "मयुरेश के साथ क्या हुआ पता है" करून अजून मिर्चमसाला टाकुन हा वृतांत ऐकवला 

प्रत्येक वेळी घटनेला हे काहीतरी फोडणी टाकुन अजुन लज्जतदार बनवुन सांगु लागले. 
"मयुरेश को जैसे लगा वो लडकी बात कर रही है, गॉगल निकालके पेहना"
"एकदम स्टाईल मे खडे हुए"


पुढे आम्ही सहलीवरुन परतल्यावर ऑफिस मधले सगळे विचारायला आले की ट्रिप कशी झाली, तर हे टपलेलेच 
"संध्याकाळी चहाला चला आमच्याबरोबर, सांगतो"

सोडणार नाही मी एकेकाला. 

--- मयुरेश मांजरे