नायगराच्या अविस्मरणीय आठवणी मनात साठवून आम्ही तिथून निघालो. मी केव ऑफ द विंड वरून वेळेवर परतलो पण जेवण अजून झाले नव्हते आणि आम्ही ज्या हॉटेल मध्ये थांणार होतो तिथे खाण्याची सोय असेलच ह्याची खात्री नव्हती. टुर मधल्या एकाने आम्हाला जवळच्या पंजाबी कार्ट विषयी सांगितले. इतर प्रवासी टुर वाल्यांशी हुज्जत घालत होते कि आम्हाला रात्रीचा व्यु बघायला मिळाला नाही आणि आमच्या कडे अजून ५ मिनिटे होती. आम्ही धावतच कार्ट कडे गेलो आणि पटापट काय हवे ते सांगितले. तो सरदारजी एवढा आरामात काम करत होता आम्ही हात टेकले. त्यात त्याचे २ वेळा फोन आणि तो एकटाच. त्यांनी आमचे जवळजवळ १५ मिनिटे घेतली आणि आम्हाला उशीर झाला. बस मध्ये परत गेल्यावर आम्हाला बस चालक आणि गाईड दोघांनी धारेवर धरले. आम्ही निमूट शांत जागेवर जाऊन बसलो.
आमचा हॉटेल २ तासावर होते. पोटात कावळे ओरडत होते. जेवण होते पण खाणार कसे बस मध्ये आणि हॉटेल काही लवकर येत नव्हते. शेवटी एकदाचे ते आले. आम्ही रूम च्या चाव्या गेह्तल्या आणि रूम वर गेलो. फ्रेश झाल्यावर जेवून घेतले. जेवण बाकी झकास होते. थोडा थंड झाला प्रवासात पण छान झाले.
दूसऱ्या दिवशी आम्ही सगळ्यांची आधी आवरून खाली गेलो. आधीच्या दिवसाची भरपाई म्हणून. सर्वात पहिले आम्ही होते. थोडे फार फोटो काढल्यावर बाकीचे मंडळी सुध्धा जमली आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
२-३ तासाच्या प्रवासानंतर आमची बस वेटकीन ग्लेन्न पार्क ला आली. गाईड ने माहिती दिल्यावर समजले कि इथे छोटासा ट्रेक करायचा आहे. बस ने आम्हाला डोंगराच्या वर सोडले आणि तिथून खाली उतरत यायचे. आम्ही चालू लागलो. आम्हाला सूचना दिल्यागेल्या कि जोर्ज ट्रेल ला धरून चालायचे. तिथे बरचसे ट्रेल आहेत त्यातला आम्ही जोर्ज ट्रेल करणार होतो. इथले ट्रेक म्हणजे सर्व सोयी सुविधा उपयुक्त ट्रेक होता. सुरक्षित पायऱ्या , कठडे, लाकडी पूल ह्या सगळ्याची सोय केलेली होती. आमचा ट्रेल एका नदीला धरून होतो. आम्ही खाली उतरू लागलो, ५-१० मिनिटानंतर ट्रेल मध्ये मज येत गेली. बाजूने संथ वाहणाऱ्या नदीचे पाणी अचानक एखाद्या उंच कथ्द्यापारून खाली कोसळत होते. ट्रेल चा रस्ता मध्येच एका बोगद्यात जायचा . कुठेकुठे तर रस्ता कडेकपारीत कोरून बनवलेला होता. एके ठिकाणी रस्ता धबधब्याचा मागून जात होता. तिथे फोटो काढण्यासाठी तर लोकानी बरीच गर्दी केली होती. फोटोग्राफर साठी तर हा तरेल एक सुंदर लोकेशनच म्हणवे लागेल. ह्याला ट्रेक पेक्षा निसर्गाच्या कुशीतला फेरफटका म्हणता येईल.ठिकठिकाणी असणाऱ्या झाडांविषयी, स्थळांविषयी माहिती देणारे फलक, जिथे दोन ट्रेल मिळताततिथे नकाशा त्यामुळे चुकण्याचा तर प्रश्नच नव्हता. एक तासात आमचा हा ट्रेल संपला. मी गाईडचे आभार मानले कि तिने हा सुंदर ट्रेल आम्हाला दाखवला.
त्यानंतर आमची बस टूर च्या शेवटच्या ठिकाणी निघाली.